बीड, दि. ९:-- गेवराई तालुक्यातील केकतपांगरी आणि परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेले रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळेे येथे काही भागात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .
गेवराई तालुक्यातील केकतपांगरी आणि परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे कोरोना बाधित झालेले रुग्ण आढळून आले आहेत असा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे.
त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गेवराई तालुक्यातील केकतपांगरी आणि परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव या दोन्ही ठिकाणी कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.
०००००
No comments:
Post a Comment