Thursday, July 16, 2020

गावाकडे गेलेल्या शिक्षकाच्या घरी गेवराई शहरात घरफोडी .


गेवराई (प्रतिनीधी ) सुट्ट्यामुळे गावाकडे गेलेल्या शिक्षकांच्या घरात कोणी राहत नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून पन्नास ते साठ हजार रूपयांचा संसार उपयोगी वस्तू लंपास केल्याची घटना गुरुवार दि.१६ रोजी पहाटे तीनच्या सुमारास शहरातील शिवाजी नगर येथे घडली.
गेवराई शहरातील शिवाजी नगर भगत राहणारे शिक्षक गौतम भागवत बारगजे हे आपल्या कुटुंबासह गावाकडं गेलेले असताना दि.१६ रोजी काही अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत व आजुबाजुला कोणी नसल्याचे पाहून पहाटे तीनच्या सुमारास घराचे कुलूप तोडून घरातील संसार उपयोगी साहित्य यामध्ये टि.व्ही, कुलर, मिक्सर, साड्या,कपडे, पाणी टाकी व भांडे असे एकूण जवळपास पन्नास ते साठ हजार रूपयांचे संसार उपयोगी साहित्य लंपास केले आहे. सकाळी शेजार्‍यांच्या ही बाब लक्षात येताच गौतम बारगजे यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ आपल्या घराची पाहणी करत या घटनेची माहिती गेवराई पोलिसांना कळविली आसरा सहा पोलिस उपनिरीक्षक सुनिल ऐटवार यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment