बीड (प्रतिनीधी )- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आ. संदीप क्षीरसागर यांच्या वतीने राष्ट्रवादी भवनामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत अनेकांनी रक्तदान केले. या वेळी आ. संदीप क्षीरसागरांसह माजी आ. सय्यद सलीम, सुनिल धांडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
काल पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा वाढदिवस होता. यानिमित्ताने आणि त्यातच रक्ताची कमतरता असल्याने आ. संदीप क्षीरसागर यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. दुपारपर्यंत अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी आ. संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ. सुनिल धांडे, फारुक पटेल, अमर नाईकवाडे, ऍड. बागलाने, चव्हाण, शेळके यांच्यासह आदींची उपस्थिती होती. दरम्यान, कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. विशेष काळजी घेत सॅनिटायझर्सची फवारणी करून रक्तदात्यांमध्ये अंतर ठेवून रक्तदान शिबीरास सुरुवात करण्यात आली होती.
No comments:
Post a Comment