Thursday, April 2, 2020

ना.धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांना मातृशोक !

* सौ.इंदुबाई भास्करराव जोशी यांचे निधन 

परळी वैजनाथ   प्रतिनिधी
      येथील गणेशपार भागातील प्रतिष्ठित व सर्व परिचित असलेल्या तथा जुन्या पिढीतील जेष्ठ पत्रकार भास्करराव जोशी यांच्या पत्नी सौ.इंदुबाई  जोशी यांचे आज दि.२ रोजी सायंकाळी निधन झाले.क्षेत्रोपाध्याय वामनगुरु जोशी व  ना.धनंजय मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्या त्या मातोश्री होत.     
      सौ. इंदुबाई  भास्करराव जोशी  यांचे  ह्र्दयविकाराच्या धक्क्याने  निधन झाले. मृत्यू समयी त्या ६३ वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती भास्करराव जोशी, वामन व प्रशांत ही दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रेमळ स्वभाव, धार्मिक वृत्ती व सर्वदुर परिचय ही सौ. इंदुबाई जोशी यांची विशेषता होती. अतिशय मनमिळाऊ स्वभाव, कुटुंबवत्सल व सर्वपरिचित असलेल्या सौ. इंदुबाई जोशी यांच्या निधनाबद्दल गणेशपार भागात शोकभावना व्यक्त होत आहेत. त्यांच्या निधनाने जोशी कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खात दै. कांतीकारी साथी परिवार सहभागी आहे.

No comments:

Post a Comment