परळी वैजनाथ(प्रतिनिधी) प्रसिद्ध छायाचित्रकार भीमाशंकर नावंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप च्या सौ सीमा परमेश्वर थोरात या 4 विरुद्ध शून्य मताने विजयी झाल्या.
परचुंडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.मीना गुरूलिंगअप्पा नावंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली सदस्य सौ.छाया रामराव सरांडे, सौ सीमा परमेश्वर थोरात व मारोती राघु थोरात यांच्यासह सरपंच सौ मीना गुरुलिंग नावंदे यांनी सौ सीमा परमेश्वर थोरात यांना मतदान केल्याने व विरोधी बाजूने शून्य मतदान झाल्याने सौ सीमा परमेश्वर थोरात 4 विरुद्ध 0 मताने विजयी घोषित करण्यात आल्या.निवडणूक निरीक्षक म्हणून श्री शुभम मोठेवाड तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गोरे डी डी यांनी काम पाहिले.
त्यांच्या विजयाने परचुंडी ग्रामपंचायत ही महिलांच्या हातात आली असून या ठिकाणी सरपंच उपसरपंचपदी महिलाच आहेत हे विशेष.
दरम्यान या निवडी नंतर गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
No comments:
Post a Comment