सिरसाळा (प्रतिनिधी ) आज दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी गुरुकुल नॅशनल स्कूल मध्ये महानायिका कवयित्री सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्या म्हणून प्रोफेसर उषा माने मॅडम तसेच प्रमुख मार्गदर्शक प्रोफेसर वाळके मॅडम पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिन्सिपल श्री नितीन जाधव सर तसेच समन्वयक श्री रुपनर सर हे होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सामूहिक गीता द्वारे अनुजा सलगर , मालती निर्मळ व प्रिया शेळके यांच्याद्वारे करण्यात आले . तद्नंतर प्रमुख पाहुणे व प्रतिनिधींच्या हस्ते क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या प्रोफेसर उषा माने मॅडम यांचा सत्कार शाळेच्या शिक्षिका शिंदे मॅडम यांनी केला व प्रोफेसर श्रीमती वाळके मॅडम यांचा सत्कार शाळेच्या शिक्षिका श्रीमती माने मॅडम यांनी केला तसेच शाळेचे प्रिन्सिपल यांचा सत्कार शाळेची विद्यार्थिनी अनुजा सलगर हिने केला तसेच शाळेचे समन्वयक श्री रुपनर सर यांचा सत्कार शाळेची विद्यार्थिनी मालती निर्मळ हिने पुष्पगुच्छ देऊन केला. तसेच सावित्रीच्या लेकी शाळेच्या समस्त शिक्षिका यांचा सत्कार विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आला. व शिक्षकांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थी गायत्री सोनवणे , यशपाल निर्मळ , रुद्र बडे, संस्कार बडे ,उत्कर्ष चोपडे, रितिका दराडे , भक्ती सोनवणे, सई नवघरे, अनुष्का वाघमारे ,आयेशा शेख, आतिफ सिद्दिकी , मयुरी कराड , आनंद देशमुख , मालती निर्मळ,अनुजा सलगर इत्यादि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती माने मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जीवन संदर्भात चर्चा करत विद्यार्थ्यांना सिंह व उंदीर या कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 'युनिटी इज पावर' या युक्तीप्रमाणे एकतेचा संदेश दिला. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या श्रीमती वाळके मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर चर्चा करत त्या म्हणाल्या ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी खूप मेहनत घेऊन विद्या अध्ययन केले व समाज सुधारण्यासाठी मेहनत घेतली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच मेहनत घेतली पाहिजे व आपलं जीवन हे सुखकर केले पाहिजे असा संदेश दिला. तसेच शाळेचे समन्वयक : श्री रुपनर सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मंचस्त मान्यवरांना संबोधित केले. महानाईका सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर चर्चा करत म्हणाले " नारी को दुनियाने जब से सन्मान दिया है, नारी ने अपनी ताकद को पहचान लिया है l आबला से नारी बन गई है सबला देखो
सच है नारीने संसार पर बडा ही उपकार किया है l या वाक्यरचना च्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे वर्णन विद्यार्थ्यांना पटवून दिले व महान नाईका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत आपल्या वाणिस विराम दिला. तसेच शाळेचे प्रिन्सिपल श्री नितीन जाधव सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामधून सर्व विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनामधून प्रेरणा घेत आपले जीवन ज्ञानमय केले पाहिजे असे वक्तव्य केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती माने मॅडम यांनी केले व समस्त विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या माध्यमातून कार्यक्रमाचा समारोप झाला.
No comments:
Post a Comment