बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यात पुन्हा दुचाकी चोर सक्रिय झाले असून बीड जिल्ह्यातील गेवराई, अंभोरा, परळी आणि अंबाजोगाई शहरातून प्रत्येकी एक दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
गेवराई शहरातील कृष्णा इंडस्ट्रीजच्या समोर मोहम्मद निसार मोहम्मद नजीर यांनी आपली दुचाकी (क्र. एम.एच. 23 ए. झेड 8061) लावली असता ती अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 9 जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी त्यांनी गेवराई ठाण्यात तक्रार दिली. आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथील शेतकरी सगुना बाळासाहेब जाधव यांची मोटारसायकल (क्र. एम.एच. 23 बी.एफ. 3318) त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 7 जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी त्यांनी काल अंभोरा पोलिसात तक्रार दिली.. परळी तालुक्यातील नागापूर येथील संदीप पांडुरंग साव यानंी आपल्या घरासमोर लावलेली दुचाकी (क्र. एम.एच. 44 एच. 5705) ही गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी त्यांनी परळी शहर ठाण्यात तक्रार दिली. अंबाजोगाई शहरातील शिवाजीनगर जनता मार्केट येथे राहणारे नईमोद्दीन समियोद्दी काझी यांची दुचाकी बाराभाई गल्ली येथून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी त्यांनी अंबाजोगाई शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
No comments:
Post a Comment