परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे बी.एच.एम.एस शिक्षण घेतलेली व्यक्ती खाजगी प्रॅक्टिस करीत आहे. या व्यक्तीने 29 वर्षीय पत्नीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत,मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. तसेच या महिलेचा शारीरिक व मानसिक छळ देखील केला शेवटी.पीडित महिलेने सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली दरम्यान या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीसात गुरनं 313 / 2022 कलम 377, 498 अ, 323, 504,34 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपी डॉक्टर व त्यांचे 7 नातेवाईक फरार झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि खोडेवाड हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment