Thursday, January 12, 2023

राज ठाकरे 18 जानेवारीला परळी न्यायालयात हजर राहणार?

*मनसे प्रमुख राज ठाकरे यांना बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयात हजर राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयात हजर होणार आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यामुळे ते येत्या 18 जानेवारीला न्यायालयात हजर राहणार आहेत.

नेमकं काय प्रकरण आहे ?

2008 मध्ये राज ठाकरेंना एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. त्या अटकेचे पडसाद परळीतही उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणीखोर वक्तव्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चार्शीट फाईल केल्यानंतर राज ठाकरे न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

आधी 3 जानेवारी आणि नंतर 12 जानेवारीला राज ठाकरेंना परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. 12 तारखेला राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आहे, त्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली आहे. त्यानुसार, आता त्यांना असून येणाऱ्या 18 जानेवारीला त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे हजर राहणार की, त्यांना तारीख वाढवून दिली जाणार, हे पाहे महत्वाचे ठरेल. 

No comments:

Post a Comment