*दुकानदारांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या - व्यापारी महासंघ.
गेवराई (प्रतिनीधी );- गेवराई शहरातील ७ दुकानदारांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी आज शनिवार दि.११ रोजी गेवराई बाजार पेठ सकाळपासून कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. या बंदचे उद्योजक महासंघाच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले असून या बंदला व्यापारी,दुकानदारांनी उत्स्फूर्त पाठींबा दिला आहे.
गेवराई शहरातील इस्लामपुरा भागात मागील काही दिवसांपुर्वी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यामुळे शहरातील संजय नगर, सावता नगर व इस्लामपुरा हा भाग कंटेन्टमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे येथील दुकाने बंद ठेवण्यात आलेल्या असताना येथील ७ दुकानदांरानी प्रशासनाच्या सुचनेचे पालन न करता आपली दुकाने उघडल्यामुळे या ७ दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान ज्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले तो भाग कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असून हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी काल शुक्रवार रोजी तहसिलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली होती. असून आज या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
No comments:
Post a Comment