* नराधमासह पत्नीवरही बलात्काराचा गुन्हा दाखल.
परळी वैजनाथ (प्रतिनीधी ):- पत्नी असतांनाही बाजुलाच राहत असलेल्या एका १६ वर्षीय मुलीस ४० वर्षीय नराधमाने फुस लावून परभणी येथे पळुन नेले आणि त्या ठिकाणी तिच्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आला. सदरील हा निर्लज्जपणा पत्नीच्या संमतीने झाला असल्याचे समोर आले. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पित्याने संभाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध काढला असता हे तिघे जण परभणी येथे असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेवून नराधमासह त्याच्या पत्नीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील ही घटना निर्लज्जपणाचा कळस गाठणारी आहे.
नसीर पाशा पठाण (वय ४०, रा.बरकतनगर) याचे गेल्या काही वर्षापुर्वी लग्न झालेले आहे. लग्न झालेले असतांनाही त्याने बाजुलाच राहणार्या एका १६ वर्षीय मुलीला अमिष दाखवत पळून नेले. मुलीला पळून नेण्यास नराधमाच्या पत्नीनेही सहकार्य केलेे. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पित्याने २ जुलै रोजी संभाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावला असता हे तिघे जण परभणी येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस कर्मचारी डी.एस.देशमुख, जमादार शिंदे, महिला कर्मचारी ढोकणे या तिघांनी परभणी येथे जावून संंबंधितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी नराधम नसीर पठाण यांच्यासह त्याच्या पत्नीच्या विरोधात कलम ३६३ भा.दं.वि. ३६६ (अ), ३७६ (एन.) ५०६ भा.दं.वि.सह कलम ४, ८ पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संभाजीनगर पोलिस ठाण्याचे बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मेंडके हे करत आहेत.
No comments:
Post a Comment