परळी वैजनाथ;- (प्रतिनीधी ) शहरालगत मोठ्या प्रमाणात विटभट्ट्या असल्याने त्याच्या प्रदुषणाचा त्रास शहरवासियांना सहन करावा लागतो. प्रदुषणामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत असल्याने या भट्ट्या शहरापासून दूर हटवाव्यात, बोगस बियाणे कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करावी या मागण्यांसाठी काल देशमुख हे उपोषणाला बसले होते मात्र प्रशासनाच्या विनंतीनंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
शहरालगत विटभट्ट्या असल्याने याचा त्रास शहरवासियांना सहन करावा लागतो. विटभट्ट्यांमुळे विविध आजारांना निमंत्रण मिळू लागले आहे. या विटभट्ट्या शहरापासून दूर हटवाव्यात, तसेच बोगस बियाणे कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या कंपन्यांनी शेतकर्यांची मोठ्य प्रमाणावर फसवणूक केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय छावाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर साईराजे देशमुख यांचे आमरण उपोषण सुरू होते मात्र नायब तहसीलदार बी.एल. रुपनर यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर त्यांच्या विनंतीनंतर उपोषण मागे घेण्यात आले. या वेळी विशाल श्रीरंग, बाजीराव काळे, धनंजय देशमुख, दराडे, केदारी, संगेवार, सारडा, लोखंडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती
No comments:
Post a Comment