बीड (प्रतिनीधी ): महाराष्ट्रात गुटखाबंदी असतांनाही जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री होत आहे. काल एका व्हिआयपी गाडीत लाखोंचा गुटखा मिळून आला होता त्यानंतर रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकातील एपीआय आनंद कांगुणे यांच्या टीमने गढी-माजलगाव रोडवर गुटख्याने भरलेला पिकअप जप्त केला. यामध्ये ८ लाखाचा गुटखा जप्त केला. ही कारवाई रात्री १२ वा. करण्यात आली.
माजलगाव-गढी रोडवर पिकअप क्र.एम.एच. ४४-९३०१ रात्री १२ वा. गढी येथून माजलगावकडे जात असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रमुख आनंद कांगुणे यांना गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली यावरून त्यांनी त्या पिकअपचा पाठलाग करत माजलगाव येथील संभाजी चौकात पिकअप ताब्यात घेतला. यामध्ये ६ लाख ५८ हजार ९४४ रुपयांचा राजनिवास गुटखा, १ लाख ६४ हजार ७३६ रुपयांचा जाफरणी जर्दा तर ६ लाख रुपये किंमतीचा महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण १४ लाख २३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, डीवायएसपी भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख एपीआय आनंद कांगुणे यांच्यासह त्यांच्या टिमने केली.
No comments:
Post a Comment