*ना.धनंजय मुंडेंच्या विशेष प्रयत्नातून IPDS योजनेअंतर्गत 100 KVA चा डी पी बसविण्यात आला.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून परळी शहरातील शंकर पार्वती नगर भागातील नवीन डीपीचा प्रश्न मार्गी लागला असून IPDS योजनेअंतर्गत 100 KVA क्षमतेचा डीपी मंजूर करून बसविण्यात आला.
ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार यासाठी महावितरण परळी उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता श्री. अंबाडकर, सहाय्यक अभियंता श्री. जिलानी तसेच शंकर पार्वती नगर भागातील तंत्रज्ञ श्रीराम मुंडे यांनी विशेष प्रयत्न केले.
या भागातील चालू यंत्रणेवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे नागरिकांना सातत्याने त्रासाला सामोरे जावे लागत होते व विजेचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नव्हता, यासाठी भागातील नागरिकांच्या मागणीचा विचार करून ना. मुंडेंनी महावितरणकडे पाठपुरावा करून येथे अतिरिक्त 100 KVA चा डीपी बसवुन घेण्यासाठी पुढाकार घेतला.
त्यानुसार आता हा अतिरिक्त डीपी बसविल्यामुळे आता परिसरातील नागरिकांना सुरळीत व नियमित वीजपुरवठा करण्यास बाधा येणार नसल्याचे उपकार्यकरी अभियंता श्री. अंबाडकर म्हणाले.
No comments:
Post a Comment