Saturday, July 11, 2020

बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर काही थांबेना.२० बाधीत आज जिल्ह्यातून तब्बल ७१७ संशयितांचे स्वॅब तपासणीला.

बीड (प्रतिनीधी )- जिल्ह्यात कोरोना महामारीचा ज्वर अधिक वाढताना दिसून येत असून गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. १० जुलै रोजी पाठविण्यात आलेलया २९३ संशयितांच्या स्वॅबपैकी तब्बल २० जण पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रथमच बीड जिल्ह्यातल्या पोलिस खात्यातही कोरोनाने घुसखोरी केली असून अंमळनेर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलिस कॉन्स्टेबल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील अनेकांना क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. जिल्ह्यातील बीड तालुक्यात आठ, धारूर चार, गेवराई सहा, आष्टी एक, धारूर एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या तालुक्यातील अनेक भाग कन्टेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. दरम्यान आज जिल्ह्यातून ७१७ स्वॅब पाठविले आहेत.
       कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग काटेकोरपणे प्रयत्नांची परिकाष्ठा करत आहेत. अशा स्थितीतही जिल्ह्यात कोरोनाचा ज्वर प्रचंड वाढताना दिसून येत आहे. काल दि. १० जुलै रोजी बीड जिल्ह्यातून तब्बल २९३ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये बीड तालुक्यातील ८ जण बाधीत आढळले. तर परळी ४, गेवराई ६, आष्टी १, धारूर १ असे २० जण रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह मिळून आले आहेत. बीड तालुक्यातील आठ जणांमध्ये सात जण हे बीड शहरातले आहेत. तर त्यातील एक जण हा अंमळनेर पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा ज्वर प्रचंड वाढत असून जिल्हावासियांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात नागरिक अपयशी ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आज जिल्ह्यातून तब्बल ७१७ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून यामध्ये बीड-६३, आष्टी -६, माजलगाव ५०, गेवराई -२१, केज ५, परळी-५७१, अंबाजोगाई १ असे  एकूण ७१७ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

बीड : ०८
५० वर्षीय पुरुष (संत तुकाराम नगर, बीड)
३० वर्षीय पुरुष (रा.तुळजाईनगर,  बीड पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित)
९ वर्षीय पुरुष (रा.घुमरे कॉमप्लेक्स, बीड पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित)
५५ वर्षीय महिला (रा. परवानानगर,बीड पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित)
३२ वर्षीय महिला (रा. परवानानगर,बीड पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित)
२४ वर्षीय पुरुष (अश्विनी लॉजजवळ, शाहूनगर रोड,बीड पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित)
२५ वर्षीय पुुरुष (अश्विनी लॉजजवळ, शाहूनगर रोड,बीड पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित)
४३ वर्षीय पुरुष (रा.चौसाळा, ता.बीड)

परळी : ०४
६२ वर्षीय महिला (रा.विद्यानगर, परळी,एसबीआय बँक येथील पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित)
४६ वर्षीय पुरुष 
(रा.नाथ्रा,एसबीआय बँक येथील पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित) ३५ वर्षीय महिला (रा.सिध्दार्थनगर,परळी)
४८ वर्षीय पुरुष (रा.गुरुकृपा नगर, नाथचित्र मंदिरसमोर, परळी)

गेवराई : ०६
२५ वर्षीय पुरुष (रा.संजयनगर गेवराई,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित)
३८ वर्षीय महिला (रा.ईस्लामपुरा, गेवराई, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित)
१४ वर्षीय मुलगी (रा.ईस्लामपुरा,गेवराई,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित)
२२ वर्षीय महिला (रा.इस्लामपुरा, गेवराई, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासित)
४७ वर्षीय पुरुष (रा.मोमीनपुरा,गेवराई)
६० वर्षीय पुरुष(रा.मोमीनपुरा,गेवराई)

आष्टी : ०१
४४ वर्षीय पुुरुष 
(रा.दत्त मंदिर गल्ली, 
आष्टी, गुलबर्गा येथून आलेला)
धारुर : ०१
४२ वर्षीय पुरुष (रा.साठेनगर, धारुर, पुणेहुन आलेला

No comments:

Post a Comment