Friday, July 3, 2020

बीड मध्ये विनाकारण फिरणे महागात.गाड्या जप्त.नागरीकांना दंड

.
बीड ;-(प्रतिनीधी ) शहरामध्ये कोरोना संसर्ग होवू नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आठ दिवसासाठी बीड शहर बंद करण्याचा निर्णय घेतला. काल स्वत: जिल्हाधिकार्‍यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या होत्या. मोक्कार फिरणार्‍याविरोधात कारवाई केली होती. आज शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला. विनाकारण फिरणार्‍या वाहन धारकांवर कारवाई करत जवळपास शेकडो दुचाकी गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. नियमाचं पालन न करणार्‍या भाजी विक्रेत्यांविरोधातही मापं जप्त करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात आला. ग्रामीण भागातील अनेक जण विनाकारण शहराच्या ठिकाणी येतात अशावरही पोलिसांनी कारवाई केली आहे. 
‘मला काही होत नाही’ या अर्विभावात अनेक जण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. तर क्वारंटाईन केलेले नागरीकही पाच ते सात दिवस घरात बसल्यानंतर शहरात फिरतांना दिसतात. अशा नागरीकांमुळेच शहरात संसर्ग झाला आहे. त्याचे उदाहरण म्हणले तर १२५ पैकी तब्बल चाळीस जण हे संसर्गातून कोरोना पॉजिटीव्ह आढळले आहेत. परवा बीड शहरात आढळून आलेले तीन रूग्ण अनेकांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे आठ दिवस बीड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले असतांना नागरीक विना कारण घराबाहेर पडत आहेत. पोलिसांनी अशा नागरीकांना काठीचा प्रसाद दिला तरी नागरीकांनी स्वत: विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान शहरातमध्ये संचारबंदी लागू असतांनाही अनेक जण विनाकामे रस्त्याने फिरत असल्याचे पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी अशा मोक्कार फिरणार्‍या विरोधात सकाळपासून कारवाई करण्यास सुरूवात केली. शहरामध्ये विविध ठिकाणी अनाधिकृतपणे भाजीपाला विक्री करणार्‍या विक्रेत्यांचे पोलिसांनी काटे आणि माप जप्त केले. काही नागरीक विनाकारण शहरात मोकार फिरतात अशांवरही पोलिसांनी कारवाई केली. जवळपास शेकडो दुचाक्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त करत नियमाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
बीड शहरात नाकाबंदी 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आठ दिवस शहर कडकडीत बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर डिवायएसपी भास्कर सावंत हे मोठा फौजफाटा घेवून रस्त्यावर उतरले. ग्रामीण पोलीसांसह शहरातील तिनही पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांना फिस्क पॉइंट देत शहरात जागो जागी नाकाबंदी केली. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरसीपीचे जवान तैनात करण्यात आले आहे. मोक्कार फिरणार्‍या लोकांना पोलीस प्रसाद देत आहे.
मास्क न वापरणार्‍या 
विरोधात दंडात्मक कारवाई
मास्क वापरणं सक्तीचं करण्यात आलेलं आहे असे असतांनाही नागरीक मास्कचा वापर करत नसल्याने दिसून येत आहे. काल केज तालुक्यात दोन रूग्ण आढळून आल्यानंतर येथील प्रशासनाने ठोस भूमिका घेत मास्क न वापरणार्‍यावर दंडात्मक कारवाई करण्यात सुरूवात केली. दुपारपर्यंत जवळपास शंभर पेक्षा जास्त नागरीकांना मास्क नवापरण्याबाबत दंड देण्यात आला. ही कारवाई सीओ विशाल भोसले, तहसीलदार दुलाजी मेंडके, पोलिस निरीक्षक प्रदिप त्रिभुवन यांच्यासह त्यांच्या कर्मचार्‍यांनी केले.

No comments:

Post a Comment