बीड (प्रतिनीधी )- बीड जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. कालच्या प्रलंबीत अहवालातील काही रुग्णांचा अहवाल आला असून त्यामध्ये पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 5 पैकी 4 परळीचे तर एक बीड शहरातला आहे.
परळी येथील आझादनगर भागातील 18 वर्षीय महिला याच भागातील 20 वर्षीय महिला, 18 वर्षीय महिला आणि 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर बीड शहरातील त्रिमूर्ती कॉलनी नंबर 3, दत्तनगर बीड येथील (गुजरातहून आलेला) 54 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आलेला आहे. प्रलंबीत अहवालापैकी 5 रुग्ण हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. उर्वरित नमुन्यांची तपासणी सुरू आहे.
No comments:
Post a Comment