Sunday, July 12, 2020

बैलजोडी चोरणारे व खताचे दुकान फोडणारे दोघे आरोपी पोलीसांनी केले जेरबंद.


बीड (प्रतिनीधी )-दिंद्रुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिन्याभरापूर्वी एका शेतकर्‍याची बैलजोडी आणि गायवासरु चोरीला गेले होते तर त्याच दिवशी एका बी-बियाणेच्या दुकानातील १ लाख ५ हजार ८५० रुपयांचे बी-बियाणे चोरी गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात दोन्ही फिर्यादींनी अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दिली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास करत दोघांनाही जेरबंद केले आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, दिंद्रुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपी अशोक सानबा पवार (रा. पौळपिंप्री ता. परळी) व त्याचा साथीदार बालासाहेब ऊर्फ बाळू विठ्ठल काळे (रा. पौळपिंप्री ता. परळी) यांनी संगनमत करून आश्रुबा राजाराम फपाळ (रा. दिंद्रुड) यांच्या शेतातून ७० हजार रुपये किमतीची बैलजोडी, गाय वासरू चोरून नेले होते तर रामकृष्ण शेषेराव मुंडे यांचे दुकान फोडून त्यातील १ लाख ५ हजार ८५० रुपयांचे बी-बियाणे चोरून नेले होते. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस करत होते. यातील एक आरोपी अशोक पवार यास पोलिसांनी पकडल्यानंतर दुसरा आरोपीही ताब्यात घेतला. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. गव्हणकर, पो.उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, पोलिस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले व पोलिस कर्मचारी पो.हे.कॉ. भास्कर केंद्रे, तुळशीराम जगताप, उबाळे, मुंजाबा कुंवारे, मिसाळ, पो.ना. नरेंद्र बांगर, चालक हराळे, पवळ यांनी केली.

No comments:

Post a Comment