Wednesday, July 1, 2020

जागेच्या संदर्भात पेठ बीड मध्ये दोन गटात दगडफेक.परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दोन्ही गट पेठ बीड पोलीस ठाण्यात.

बीड;-  (प्रतिनीधी ) एमआयडीसी भागातील अतिक्रमण काढण्यासाठी 25 ते 20 लोकांनी एमआयडीसीला अर्ज दिला होता. ते अतिक्रमण नसून आमची हक्काची जागा आहे असे म्हणत दोन गट एकमेका भिडले. यामध्ये दोन्ही गटातील दहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना काल रात्री 9.30 च्या सुमारास रामतिर्थ परिसरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दोन्ही गट आज पेठ बीड पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. 
   पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी भागात लांडगे व्यक्तीने अतिक्रमण केले असून ते अतिक्रमण काढण्यासाठी दुसर्‍या लांडगे गटाच्या वीस ते पंचवीस लोकांनी एमआयडीसीला पत्र दिले होते. मात्र ते अतिक्रमण नसून आमची हक्काची जागा आहे. तुम्ही वारंवार एमआयडीसीला अतिक्रमण काढा म्हणून पत्र का देतात? असे म्हणत दोन्ही गट रात्री 10.30 च्या दरम्यान आमनेसामने आले. अन दगडफेक झाली. यामध्ये दोन्ही गटातील दहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आज सकाळी पेठ बीड पोलिस ठाण्यात परस्पविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

No comments:

Post a Comment