Tuesday, July 14, 2020

परळी शहरात संचारबंदीचा कालावधी 20 जुलैपर्यत.जिल्हधिकारी यांचे आदेश .


परळी वैजनाथ ;-(प्रतिनिधी) परळी शहरात कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत असल्याने संचारबंदी कालावधी पाच दिवसांनी वाढुन तो 20 जुलै पर्यंत करण्यात आला आहे.याबाबतचे आदेश जिल्हाधिकार्यांनी पारित केले आहेत. परळी शहरात दि.4 जुलै पासुन कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.परळी शहरात समुह संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने जमावबंदी करावी अशी शिफारस आरोग्य विभागाने दिल्यानंतर परळी  शहरात दि.14 जुलै  पर्यंत संचारबंदी कायम होती.आज दि.14 रोजी पुन्हा चार जण पॉझीटिव्ह आढळल्याने संचार बंदीचा कालावधी वाढवून 20 जुलै पर्यंत करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment