परळी (प्रतिनिधी) दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त शाळेचे प्राचार्य डॉ.श्रीकांत पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री. किरण गित्ते साहेब IAS सचिव :सार्वजनिक बांधकाम ,आरोग्य ,उद्योग , कुटुंबकल्याण ,माहिती तंत्रज्ञान पर्यटन विभाग त्रिपुरा सरकार , विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ. श्रीकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी DWPS वंडरलैंडच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली टाले मॅडम उपस्थित होते.दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी स्वागत गीत, देश भक्तीपर गीतांवरील नृत्यांनी हा सोहळा उत्साहात साजरा केला .
यावेळी DWPS वंडरलँडच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली टाले मॅडम व सर्व शिक्षक ,शिक्षीका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment