Tuesday, January 6, 2026

शिवसेनेच्या वतीने परळीत ममता दिन साजरा.तमाम शिवसैनिकांच्या प्रेरणास्थानी माँ साहेब स्व.मीनाताई ठाकरे – शिवसेना नेते अभय कुमार उर्फ पप्पू ठक्कर.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)   तमाम शिवसैनिकांच्या जीवनातील प्रेरणा, ऊर्जा व वात्सल्याची मूर्ती म्हणजे माँ साहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे असून, त्यांचे विचार आजही लाखो शिवसैनिकांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष तथा माजी उपजिल्हाप्रमुख अभय कुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी केले.
मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी परळी येथील सतीश अण्णा जगताप यांच्या संपर्क कार्यालयात माँ साहेब स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ साहेब स्व.मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना बळ देणाऱ्या माँ साहेब मीनाताई ठाकरे या केवळ एका कुटुंबापुरत्या मर्यादित नव्हत्या, तर त्या संपूर्ण शिवसैनिक कुटुंबाच्या मायेसमान होत्या. त्यांचे साधेपण, त्याग, संस्कार आणि शिवसेनेवरील निष्ठा आजही आम्हा शिवसैनिकांच्या हृदयात जिवंत आहे. माँ साहेबांचे विचार आणि स्मृती शिव सैनिकांना सदैव प्रेरणा देत राहतील असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनोज संकाये, युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा. अतुल दुबे, माजी नगरसेवक रमेशआप्पा चौंडे, ज्येष्ठ नेते सतीश जगताप, पत्रकार संतोष जुजगर, बालाजी ढगे, शिवसेना उपशहर प्रमुख किसन बुंदिले, माजी युवासेना विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवसेना शहर संघटक संजय कुकडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment