Monday, January 12, 2026

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध.साखरपुडा झाल्यानंतरही लग्नास नकार.एकावर गुन्हा दाखल.

आष्टी (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवत साखरपुडा झाल्यानंतरही लग्नास नकार दिला. या प्रकरणी पोलिस अंमलदाराविरुद्ध अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
आष्टी तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय पीडितेशी मच्छिंद्र हरिभाऊ राठोड याने १ एप्रिल २०२२ ते १ मार्च २०२५ या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. आरोपी पोलिस भरती झाल्यानंतरही गावी आल्यावर हा प्रकार सुरू होता. प्रकरण उघडकीस आल्यानंतर साखरपुडा झाला, मात्र नंतर त्याने लग्नास नकार दिला. या प्रकरणी पीडितेने अंभोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा
दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंभोरा पोलिस करीत आहेत

No comments:

Post a Comment