बीड (प्रतिनिधी) केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी सदरील खटल्यातील आरोपींनी न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली होती. सदरील अर्जावर विशेष सरकारी वकिलांनी लेखी म्हणणे सादर करावे, असा आदेश मकोका न्यायाधीश पी. व्ही. पाटवदकर यांनी गुरुवारी दिले.
३ जानेवारी रोजी होणार सुनावणी.
कलम ३३० प्रमाणे कुठल्या कागदपत्राप्रमाणे पुरावा देणार आहोत, ती कागदपत्रे बचाव पक्षाला कबूल आहेत की नाहीत यासाठीचा अर्ज सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात सादर केला. त्यावर बचाव पक्ष आपली म्हणणे सादर करणार आहेत. तसेच सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आलेल्या हल्ल्याचे व्हिडीओ सर्व आरोपींच्या वकिलांना पेन ड्राइव्हमध्ये देण्याच्या सूचना मागील सुनावणी दरम्यान देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पेन ड्राइव्ह आरोपींच्या वकिलांना देण्यात आले आहेत. पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार आहे.
No comments:
Post a Comment