लातूर (प्रतिनिधी) शहरातील जवाहर नवाेदय विद्यालयात सातवीमधील एका विद्यार्थिनीने वसतिगृहात टाॅवेलने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता समाेर आली. अनुष्का किरणकुमार पाटाेळे (वय १२, रा. टाका ता. औसा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी शाळेतील दाेषींविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संताप व्यक्त केला.
नातेवाईकांच्या आक्राेशाने दिवसभर रुगणालय परिसरात तणावाचे वातावरण हाेते. रात्र झाल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. कुटुंबीयांनीही त्याला विराेध दर्शवत जाेपर्यंत गुन्हा दाखल हाेत नाही, ताेपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. याबाबत रात्री उशिरापर्यंत कुठलाही नाेंद झाली, नसल्याचे पाेलिसांनी सांगितले. अनुष्काने जिथे गळफास घेतला त्या हाॅलमध्ये दाेन महिला कर्मचारी आणि १८ विद्यार्थिनी हाेत्या. काेणालाच कसे काय दिसले नाही? असा सवाल अनुष्काचे वडील किरणकुमार पाटाेळे यांनी केला आहे.
अनुष्काने शेवटचा काॅल शुक्रवार, २ जानेवारी राेजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास केला हाेता. तिने आईशी पाच मिनिटे संवाद साधला. ती हसून बाेलल्याचे आईने सांगितले. अनुष्काने काॅल केल्यानंतर आईला म्हणाली, मम्मी तू आणि अंटी मला शेंगदाण्याचे लाडू, बिस्कीट पुडे घेऊन ये. मी लग्नाला येते, मात्र माझी परीक्षा आहे. लग्न लावून लागलीच परत जाणार आहे.
No comments:
Post a Comment