अहमदपूर (प्रतिनिधी) : गुरुवार दि १५ जाने २५ रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर नवप्रतिष्ठान जळकोट जि लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आयोजित राज्यस्तरीय नवलेखक कविता लेखन कार्यशाळा २०२५-२६ येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. शेवटच्या सत्रात नवकवी आणि किर्तनकार रामेश्वर बा माने आणि प्रा भगवान आमलापुरे यांना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचे सदस्य, सुप्रसिद्ध साहित्यिक विलास सिंदगीकर, सत्राधक्ष प्राचार्य चंद्रशेखर कळसे, कविवर्य प्रा डॉ ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर नवप्रतिष्ठान जळकोट जि लातूरचे संस्थापक अध्यक्ष श्री संग्राम कदम , कवी आणि मुख्याध्यापक प्रफुल्ल धामणगावकर आणि जेष्ठ पत्रकार राजेंद्र धुळगुंडे. फोटो क्लिक : संजीवकुमार भोसले.
No comments:
Post a Comment