Tuesday, October 4, 2022

भवानीनगर दुर्गोत्सव येथे होम हवन संपन्न. आई जगदंबे सर्वांना आरोग्यमय आयुष्य दे. - भोजराज पालीवाल



परळी वैजनाथ/(प्रतिनिधी)  एका मागून एक दोन वर्ष कोरोनाच्या दुष्टचक्रात गेले, परिणामी आई जगदंबेची सेवा करता आली नाही आता कोरोनाचे संकट गेले असून येथून पुढे असे कोणतेही आरोग्य संकट न येता सर्वांना निरोगी आयुष्य आई जगदंबेने द्यावे अशी प्रार्थना भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा शिवसेना माजी शहर प्रमुख श्री भोजराज पालीवाल यांनी केली.

आज मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी भवानीनगर येथे दुर्गाष्टमीच्या निमित्ताने भवानीनगर दुर्गोत्सव मंडळात श्री भोजराज पालीवाल यांच्या हस्ते  होम हवन करण्यात आले. यावेळी कुंडात आहुती देताना आमच्यावरील आरोग्य संकट यापुढे न येऊ आणि शेतकरी, व्यापारी व नागरिकांना आनंदाचे दिवस देवो अशी प्रार्थना श्री पालीवाल यांनी दुर्गादेवीला केली.

यावेळी नारायण सातपुते, गजराज पालीवाल, महेश केंद्रे नगरसेवक अनिल आष्टेकर , निलेश पालीवाल धीरज बाहेती गणेश शिरसाट,दिलीप तलवारे हरीश पालीवाल प्रकाश साळुंखे, लक्ष्मण शर्मा बालासाहेब चव्हाण संतोष सावंत, सोमनाथ मोरे, सुरेश जाधव, पिटू जाधव यांच्यासह असंख्य भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment