Sunday, February 12, 2023

विजेचा शॉक लागून विद्यार्थिनीचा मृत्यू.

धारूर (प्रतिनिधी) नळाला पाणी आल्याने अठरा वर्षीय विद्यार्थिनीने मोटर लावली असता या वेळी तिला विजेचा जबरदस्त शॉक बसला. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शहरातील कसबा भागामध्ये घडली आहे.
कोमल रामेश्वर शिंदे या विद्यार्थिनीने पाण्यासाठी मोटर लावली होती. पाणी भरत असताना तिला विजेचा जबरदस्त धक्का बसल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोमल ही बारावी वर्गात शिक्षण घेत होती. तिच्या निधनाने शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment