Saturday, February 18, 2023

पवनराजे बँकेच्या वतीन महाशिवरात्री निमित्त फराळाचे वाटप.श्री सोमेश्वर महाराजांच्या पालखीचे केले स्वागत.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाशिवरात्री निमित्त पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी अर्बन बॅकेच्या वतीने आज शनिवार दि.18 फेब्रुवारी रोजी  महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर महाराजांच्या पालखीचे पूजन करून स्वागत करण्यात आले. यावेळी पालखीतील भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंडपणे महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर महाराजांची पालखीतील वारकर्‍यांना पवनराजे अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद रंगनाथराव सावंत  यांच्या हस्ते भाविक भक्तांना साठी फराळाचे वाटप करण्यात येते. सोमेश्वर महाराजांची पालखी वैद्यनाथ प्रभूला भेटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून जाते. या पालखी सोबत येणार्‍या भाविक भक्तांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले. 
यावेळी पवनराजे बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांच्यासह सचिव गोविंद भरबडे, उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे ,कोषाध्यक्ष गोविंद मुंडे, सहसचिव प्रल्हाद काळे,संचालक सचिन भरबडे,ज्ञानेश्वर सातपुते, विनायक राठोड, परमेश्वर काळे, राउत सर,पवन सावंत, कर्मचारी अमर सुर्यवंशी, शुभम पालाकुडतेवार, अश्विनी कोरे सुजाता पवार,आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment