मेष : महत्त्वाचा निर्णय अथवा मोठे काम सकाळीच करून घ्या. नंतर विलंबाने यश मिळेल. धंदा वाढेल.


वृषभ : कोर्ट कचेरीच्या कामात यशस्वी व्हाल. धंद्यात काम मिळेल. नोकरीचा प्रयत्न करा.


मिथुन : कठीण काम करण्याचा प्रयत्न करा. अधिकारीवर्गाशी सलोख्याने वागा. वाहन जपून चालवा.


कर्क : दुखापत होण्याचा संभव आहे. कोणतेही काम सावधपणे करा. मान-प्रतिष्ठा मिळेल.


सिंह : सकाळी लवकर महत्त्वाची कामे करा. दुपारनंतर धावपळ होईल. विरोध सहन करा.


कन्या : सकाळी झालेला वाद चहानंतर मिटेल. महत्त्वाचा फोन येईल. शेजार्‍याला मदत करावी लागेल.


तूळ : सकाळी होणारी कामे दुपारनंतर रेंगाळण्याची शक्यता आहे. नोकरीत कामाचा व्याप वाढेल.

वृश्चिक : महत्त्वाचा निर्णय घेता येईल. विचारांना चालना मिळेल. स्पर्धेत जिंकाल. खर्च जास्त होईल.


धनु : साहित्याला नवा विषय मिळेल. नवीन ओळख होईल. नोकरीत वरिष्ठांच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल.


मकर : दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. ठरविलेली योजना चांगल्याप्रकारे पूर्ण करता येईल.


कुंभ : धंद्यासाठी नवा मार्ग मिळेल. मुलांची प्रगती पाहून तुम्हाला समाधान मिळेल. नवी ओळख होईल.


मीन : सकाळी आलेली समस्या जेवणानंतर कमी होईल. नव्या विषयात रममाण व्हाल.