राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी तांत्रिक तपास करुन नाशिक येथुन एका आरोपीला अटक केली. यानंतर प्रमुख आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
Thursday, February 23, 2023
नौकरी लावतो च्या नावाखाली शिक्षक प्रियकरानेच प्रेयसीला संपवले.
अहमदनगर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एका बेपत्ता असलेल्या मुलीचा प्रियकरानेच घातपात केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी हा प्राथमिक शाळेतील शिक्षक असून त्याने एका मुलीला फुस लावून पळवून नेले आणि साथीदारांच्या मदतीने तिचा खून केला. ही मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद राजुर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली होती. या मुलीला वासळी येथील दत्तु धोंडु डगळे याने आणि त्याचा साथीदार मनोहर पुनाजी कोरडे याने शहापुर तालुक्यातील साकुर्ली परिसरातील एका दगडाच्या खाणीमध्ये मुलीला मारुन फेकुन दिल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या मुलीला नोकरीच्या नावाखाली गाडीत बसवुन आरोपींनी नेले होते. दरम्यान, यानंतर या मुलीची मिसिंगची तक्रार राजुर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
.jpeg)
No comments:
Post a Comment