अंबड तहसीलचे तहसिलदार कडवकर आपल्या दालनात दुपारी अडीचच्या सुमारास जेवण करत असताना तहसिल कार्यालय परिसरात आलेल्या दोघांनी तहसीलदार कडवकर यांच्या दालनात घुसुन दालनाचा दरवाजा बंद केला. यानंतर तहसीलदार कडवकर यांना बेदम मारहाण केली. तहसीलदार कडवकर यांनी त्यांच्या तावडीतून सुटाका करून घेत तहसिल कार्यालयाच्या आवारात आरडाओरड करत धाव घेतली. तरी देखील तहसिल कार्यालयाच्या आवारात ही त्यांना बेदम मारहाण करून हे हल्लेखोर कार घेऊन पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.
गुन्हा दाखलची प्रक्रीया सुरू
हल्ला करणारा हा ठाकरे गटाचा अंबड तालुका प्रमुख असल्याची माहिती समोर आले आहे. या हल्ल्यात तहसीलदार जखमी झाले असून या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाळू माफियाकडून थेट तहसीलदार यांना तहसिल कार्यालयात मारहाण झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलिस अधिक तपास करत असून हा हल्ला ठाकरे गटाचे अंबड तालुका प्रमुख पंकज सोळुंके यांनी केला असल्याचा आरोप महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यासह तहसीलदार यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment