बारावीची परीक्षा आज, २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. बारावीच्या परीक्षा देण्यासाठी हजारो विद्यार्थी सज्ज झाले आहेत. मात्र, बारावीची परीक्षा सुरू होण्याआधी दुर्देवी घटना घडली आहे. परीक्षा अवघ्या २४ तासांवर ठेपलेली असताना एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
औरंगाबादच्या एन.८ सिडको भागातील गुरुनगर हौसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. सोमवारी २० फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. विद्यार्थ्याने परीक्षेच्या तणावातून जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांसह नातेवाईकांनी वर्तवला आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आमन रविंद आहेरेवाल असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
No comments:
Post a Comment