मुंबई (प्रतिनिधी) येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी आणि कच्छला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात यलो अलर्ट देण्यात आला असून, तापमान ३९ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
पुढचे ४८ तास या भागाला उन्हाच्या झळा जाणवणार आहेत, असे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत बाहेर जाणे टाळावे, तसेच प्रवास करताना पाण्याची बाटली जवळ आवश्यक ठेवावी आणि काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या दोन दिवसात तापमान वाढून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान 37-39°C च्या रेंजमध्ये राहणार आहे. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत प्रचंड उन्हाचा कडाका जाणवणार असून, दरम्यानच्या काळात या भागातील लोकांनी काळजी घेण्याचे आव्हान हवामान विभागाने केले आहे.
No comments:
Post a Comment