Friday, February 17, 2023

कल्याणकारी शिव मंदिराचे आज आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते भुमीपूजन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्री कल्याणकारी हनुमान मंदिर, नविन माणिकनगर येथे आज महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त कल्याणकारी शिव मंदिर उभारणीच्या कामाचा शुभारंभ आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होत असून या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष बाजीरावभैय्या धर्माधिकारी तथा जेष्ठ नेते सुरेश टाक यांनी केले आहे.
नविन माणिकनगर येथे असलेल्या कल्याणकारी हनुमान मंदिर परिसरात आज महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कल्याणकारी शिव मंदिर उभारण्यात येत आहे. आज 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शिव मंदिर उभारणीचा भुमीपूजन सोहळा होत आहे. या कार्यक्रमास नविन माणिकनगर मधील सर्व नागरिक तसेच भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष बाजीरावभैय्या धर्माधिकारी तथा जेष्ठ नेते सुरेश टाक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment