Monday, February 20, 2023

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवात गर्दीचा फायदा घेवुन चोरट्याने बारा मोबाईल चोरले.

दोघांच्या सोन्याच्या चैनवरही मारला ‘डल्ला’.

बीड, (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव रात्री मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा उचलून चोरट्याने हात मारला. बारा जणांचे मोबाईल आणि दोघा जणांचे सोन्याचे चैन चोरले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रात्री उत्सवानिमित्त मोठी गर्दी उसळली होती, या गर्दीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरले.बेदरे दिपक, शेख लाल बाबु, संतोष पडुळे, अभिजीत पवार, अभिषेक जाधव, रामेश्‍वर राठोड, राहुल कोरडे, संदीप गोडसे, आसाराम शेंडगे यांच्यासह आदी बारा जणांचे मोबाईल चोरीला गेले. दोन जणांच्या सोन्याच्या चैन चोरीला गेल्या. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment