Thursday, October 8, 2020

परळी येथे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी आंदोलनाला सुरूवात.


परळी वैजनाथ ;-- परळी येथे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीवर एल्गारस सुरूवात झाली. येथे आज गुरुवार (दि.8) रोजी परळीतील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालयासमोर सकाळी बेमुदत साखळी पद्धतीने आंदोलन सुरू झाले आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता .असे आज (गुरुवार) रोजी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे .

मराठा समाजातील युवकांच्या नोकरीचा प्रश्न अत्यंत जिकरीचा बनला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक आरक्षण नाही. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने आरक्षणाचा प्रश्न मोठा झाला आहे .त्या अनुषंगाने आज रोजी ही घोषणा मराठा आरक्षणासाठी परळीतील युवक नेते आणि ज्येष्ठ मंडळी तहसील कडे रवाना झाली आहे पुढील हे आंदोलन तहसील कार्यालय परिसरात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment