Tuesday, October 20, 2020

सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी दुर्गोत्सवातून कोरोना जनजागृती करणार-भोजराज पालीवाल.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाय योजना करतांनाच याबाबत काळजी कशी घ्यावी या संदर्भातील प्रचार करणार असल्याची माहिती भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष भोजराज पालीवाल यांनी दिली.
भवानीनगर येथे दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साहपूर्ण वातावरणात गजराज पालीवाल यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत पुजनाने देवी मुर्तीची घटस्थापना करण्यात आली. दरवर्षी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करीत असतो, परंतू यावर्षी कोरोना महामारीमुळे या विषयावर उपाय योजना करणारे उपक्रम राबविणार असल्याची माहिती भोजराज पालीवाल यांनी दिली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष भोजराज पालीवाल, सल्लागार  माऊली फड, नारायणराव सातपुते, बद्रीसेठ बाहेती, डॉ.तुषार पिंपळे, संदीप चौधरी, गजराज पालीवाल, महेश केंद्रे, जगन्नाथ सोळंके, प्रकाश सोळंके, दिलीप तलवारे, मंडळांचे अध्यक्ष हरीश पालीवाल, कार्याध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्ष आनंद पालीवाल, कोषाध्यक्ष संतोष सावंत     सचिव रामदेव धामत  इत्यादी व्यापारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment