Friday, October 16, 2020

राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त दैनिक पुढारी व शरद पवार विचार मंचच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार.


परळी वैजनाथ (प्रतिनीधी ) राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त दैनिक पुढारी व शरद पवार विचार मंचच्या वतीने परळी शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा गुरूवारी (दि.15) सत्कार करण्यात आला.
शहरातील नाथचित्र मंदिर परिसरात हा कार्यक्रम झाला. दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शहरातील वृत्तपत्राचे एजंट, वितरक, विक्रेते यांचा पुष्पगुच्छ, मास्क, सॅनिटायझर व ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पुढारीचे एजंट बाळासाहेब काटे, शिवा कोडे, महारुद्र कोडे यांच्यासह उद्धव हाडबे, रामेश्वर पौळ, अभिजीत कुलकर्णी, बळीराममामा साळवे, सावता डाके, शिवाजी केंद्रे यांच्यासह शहरातील वृत्तपत्र विक्रेते यावेळी उपस्थित होते. दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी लक्ष्मण वाकडे, शरद पवार विचार मंचचे बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख, शहराध्यक्ष श्रीकांत माने, मराठवाडा शिक्षक संघाचे तालुका सचिव बंडू आघाव, पत्रकार धिरज जंगले, प्रमोद राजमाने, गणेश राजमाने, रामेश्वर मुळेआदी यावेळी उपस्थित होते. सत्काराच्या कार्यक्रमानंतर संयोजकाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी चहा, पान, फराळाची व्यवस्था करण्यात आली.

No comments:

Post a Comment