Monday, October 12, 2020

दादाहरी वडगाव येथील आरक्षण धरणे आंदोलनात परळीतील मराठा तरूणांनी भेट देऊन घेतला सहभाग.



परळी वैजनाथ  (प्रतिनिधी )- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे बेमुदत साखळी पध्दतीने आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे गावातील महिला, लहान मुले, तरूण , आणि जेष्ठांचाही यांत उत्स्फूर्त सहभाग आहे. आज आंदोलनाचा ६ वा दिवस असून जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत अखंडपणे हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय सर्वमुखी घेण्यात आला आहे 
जोपर्यंत मराठा समाजाच्या या जिव्हाळ्याच्या मागण्या पूर्ण केल्या जाणार नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम निर्णय दादाहरी वडगाव ग्रामस्थांनी घेतला आहे या ठिकाणी आज परळीतील मराठा तरूणांनी भेट देऊन आंदोलन सहभाग घेतला यावेळी ओम काळे,  निखेश पाटील , पवन बोडके , अरूण सपाटे , कैलास नाईकवाडे, साईराज देशमुख, भागवत साबळे, गोविंद जाधव, महादू साबळे , यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

No comments:

Post a Comment