
परळी वैजनाथ (प्रतिनीधी )- लोकांसाठी असलेले स्वस्त धान्य दुकानावरील धान्य वाटप न करता हजारो टन धान्याचा अपहार केल्या प्रकरणी परळी शहरातील ९ राशन दुकानांचे परवाने जिल्हाधिकार्यांनी रद्द केल्यामुळे राशन दुकानदारांत खळबळ उडाल आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी शहरातील बरकत नगर भागात असलेल्या जावेद खान पठाण यांचे दुकान, भीमनगर भागातील अविनाश आदोडे यांचे दुकान, शहरातील सोमेश्वर नगर भागातील नाथराव मुंडे यांचे दुकान, चांदापूर भागातील संग्राम गिते यांचे दुकान, पंचशीलनगर भागातील कमलेश जगतकर, इंदिरानगर भागातील राजन वाघमारे, हलगी गल्लीतील मधुकर जायभाये, गुरुकृपानगरममधील उद्धव मुंडे या राशन दुकानदारांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी आपल्या भागातील गरीब लोकांसाठी स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटप न केल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकार्यांकडे आल्या होत्या. या बाबत जिल्हाधिकार्यांनी स्वत: परळी तहसील कार्यालय आणि जिल्हा पुरवठा विभागाकडून चौकशी करून खात्री झाल्यानंतर काल यांचे राशन दुकान रद्द केल्या आहेत. जिल्हाधिाकार्यांच्या या कारवाईमुळे घोटाळा करणार्या राशन दुकानदारात मात्र खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment