Sunday, October 11, 2020

आनंदाची बातमी मुंबई-नांदेड- मुंबई विशेष रेल्वे सेवा होणार सुरु.


नांदेड- प्रवाशांच्या सुविधे करिता मुंबई-नांदेड-मुंबई विशेष रेल्वे सुरु करण्याचे ठरविले आहे. हि रेल्वे पूर्ण पणे आरक्षित असेल.अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणार नाही. या गाडीचा वेळा आणि दिनांक पुढील प्रमाणे असतील —

१. गाडी संख्या ०११४१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते हुजूर साहेब नांदेड – हि गाडी दिनांक ११ ऑक्टोबर २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रोज सायंकाळी १६. ३५ वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०५. ३० वाजता पोहोचेल.

२. गाडी संख्या ०११४२ हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई — हि गाडी दिनांक १२ ओंक्टोबर २०२० पासून हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानकावरून रोज सायंकाळी १७. ०० वाजता सुटेल आणि औरंगाबाद-मनमाड मार्गे मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०५. ३५ वाजता पोहोचेल.
हि गाडी दोन्ही दिशेला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी आणि पूर्णा येथे थांबेल.

या गाडीस एकूण १८ डब्बे असतील. या गाडीत वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी, द्वितीय श्रेणी आरक्षित आणि आरक्षित सीटिंग डब्ब्यांची सुविधा असेल.

हि विशेष गाडी नियमित रेल्वे गाडी सुरु होई पर्यंतच असेल.

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.

No comments:

Post a Comment