Tuesday, October 6, 2020

धनंजय मुंडेंची विधानसभेतील आणखी एक वचनपूर्ती. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच झाले सुरू!


परळी वैजनाथ (दि. ०६)- : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आणखी एका वचनाची पूर्ती केली असून, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील दोन वर्षांहून अधिक काळापासून बंद असलेले संच क्र. ६, ७ व ८ हे तीनही संच आजपासून सुरू करण्यात येत आहेत.

परळीचे औष्णिक विद्युत केंद्र हे परळीचे वैभव असून, मराठवाड्यात त्याची ख्याती आहे. मागील सरकारच्या काळात हे संच बंद पडल्याने परळीच्या बाजारपेठेवर त्याचा प्रत्यक्ष परिणाम झाला. त्याचबरोबर प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रित्या अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले होते. 

त्यामुळे निवडणुकीपूर्वी केंद्रातील तीनही संच पुन्हा सुरू करण्यासाठी आपण पाठपुरावा करू असे अभिवचन परळीकरांना दिले होते. आज ते पूर्ण होताना पाहून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. तसेच औष्णिक विद्युत केंद्रातील मुख्य अभियंता श्री. शिंदे यांच्या सह सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे व शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान हे तीन संच सुरू करावेत यासाठी धनंजय मुंडे यांच्या वतीने रा. कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी रेग्युलेटरी कमिशन कडे कायदेशीर अपिलही केले आहे.  ना. मुंडे हे यासाठी सातत्याने ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांच्याकडे मागणी करून हे संच ( must run ) मस्ट रन  करण्याबाबत आग्रह धरला आहे.

त परळी तालुक्यातील दाऊतपूर, दादाहरी वडगाव येथील औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ६, ७ व ८ हे प्रत्येकी अडीचशे मेगावाट क्षमतेचे तीनही संच आज सुरू करण्यात आल्याने परळीतही समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment