
परळी वैजनाथ ;-- मराठवाडा साहित्य परिषद परळी शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या व 5 सप्टेंबर रोजी घोषित झालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 चे वितरण बुधवारी करण्यात येणार आहे.
बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता बचपन प्ले स्कूल कावेरी प्लाझा रोड परळी वैजनाथ येथे हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
परळी मसापच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक ,सामाजिक ,साहित्यिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो.
याच कार्यक्रमात स्वर्गीय मोहनलाल बियाणी स्मृती सेवा गौरव पुरस्कार आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दलचा साहित्य गौरव पुरस्कार 2020 हे देण्यात येणार आहेत.
सदरील पुरस्कार पाच सप्टेंबररोजी शिक्षक दिनी घोषित झालेले असून त्याचे वितरण बुधवारी करण्यात येणार आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षिका यांनी आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित रहावे इतरही शिक्षण प्रेमींनी या कार्यक्रमास यावे .
सदरील कार्यक्रम कोरोना प्रादुर्भावाचे नियम पाळून संपन्न होणार आहे .
तरी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन परळी मसापचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी सचिव राजकुमार यल्लावाड कार्याध्यक्ष अनंत मुंडे कोषाध्यक्ष संजय आघाव उपाध्यक्ष अरुण पवार निवड समिती प्रमुख बंडू आघाव यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment