Thursday, October 29, 2020

रोहित पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हा तालुका,शहर अध्यक्ष यांच्या नियुक्त्या.


चंद्रपुर ;- (प्रतिनीधी) छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालविणारी तसेच राज्याचे नेतृत्व आदरणीय रोहित दादा पवार यांच्या विचाराने ज्याप्रमाणे राज्यभर सामाजिक कार्य व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविले व राज्यातील तळागाळातील लोकांना हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे . आज रोहित पवार विचार मंच चे तालुका अध्यक्ष, व शहर अध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. 
चंद्रपूर शहर अध्यक्ष पदी सतीश भाऊ मांडवकर , राजुरा तालुका अध्यक्ष पदी सूचित कावळे , राजुरा शहर अध्यक्ष पदी आस्टीन सावरकर , चंद्रपूर तालुका अध्यक्ष पदी गोपाल पिंपळकर , गडचांडूर शहर अध्यक्ष प्रवीण मेश्राम, कोरपना तालुकाअध्यक्ष पदी  संतोष मानुसमारे,  गडचांदुर शहर उपअध्यक्ष  करणंसिंह बुरानी  यांच्या नियुक्ती रोहित पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अभिजित कुडे यांनी करून त्यांना शुभेच्छा दिल्या . यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ भटारकर, राष्ट्रवादी किसान सेल जिल्हा अध्यक्ष सुरेश रामगुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड , राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी , राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे , वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर , राजुरा शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार , युवक जिल्हा सरचिटणीस सिहाल नगराडे, जिल्हा सचिव अभिनव देशपांडे , डॉक्टर सेल जिल्हा अध्यक्ष  रोहित आंबेकर शहर उपाध्यक्ष कुणाल ठेंगरे , हिमांशू  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment