Friday, October 2, 2020

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला शेतकरी संघर्ष समितीने कुलूप लावले.आंदोलनकर्त्यांना सिक्युरिटी गार्डची अरेरावी.



* बँकेची अरेरावी खपवून घेतली जाणार नाही.


बीड (प्रतिनीधी )- जिल्हा मध्यवर्ती बँकेला शेतकर्‍यांच्या कर्जापोटी शासनाकडून पाचशे ते सहाशे कोटी रुपये जमा होवूनही शेतकर्‍यांना आजपर्यंत फक्त 100 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले. प्रशासनाच्या या निषेधार्थ आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मुख्य शाखेला कुलूप लावण्यात आले. या वेळी कुलूप लावण्याच्या कारणावरून सिक्युरिटी गार्ड आणि थावरे यांच्यात वादावादी झाली. सिक्युरिटी गार्डने थावरेंना अरेरावाची भाषा वापरली. गार्डची ही अरेरावी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा थावरे यांनी दिला. ही बँक शेतकर्‍यांची आहे, बँकेने शेतकर्‍यांच्या हिताचेच निर्णय घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
खरीप हंगाम संपत आला तरी सर्व शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळालेले नाही. बँका पीक कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकर्‍यांच्या कर्जापोटी शासनाकडून 500 ते 600 कोटी जमा झालेले आहेत. मात्र शेतकर्‍यांना फक्त 100 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झालेले आहेत. डीसीसी बँकेने कर्ज वाटपाचे टार्गेट पूर्ण केले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍याने बी भरणासाठी सावकाराकडून व हातउसने पैसे घेतलेले आहेत. अशा परिस्थितीत बँका जर शेतकर्‍यांना कर्जवाटप करत नसतील तर या बँका शेतकर्‍यांसाठी आहेत की धनदांहग्यांसाठी? असा प्रश्‍न उपस्थित करत आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गांधी जयंतीदिनी डीसीसी बँकेच्या मुख्य शाखेला कुलूप लावले. या वेळी कुलूप लावताना सिक्युरिटी गार्ड आणि थावरे यांच्यात वादावादी झाली. सिक्युरिटी गार्डने थावरे यांना अरेरावीची भाषा वापरली. ही अरेरावीची भाषा खपवून घेतली जाणार नाही, बँक कुणाच्या बापाची जागीर नाही ती शेतकर्‍यांची आहे. बँकेने शेतकर्‍यांचे हितच जोपासावे, असे थावरे यांनी म्हटले आहे.


No comments:

Post a Comment