Sunday, October 11, 2020

जिल्हा अधिकार्याच्या आदेशाला केराची टोपली,जिल्हा अधिकारी आले की कडक बंदोबस्त.गेले की जैसे थे तैसे!


बीड (प्रतिनिधी )बीड जिल्हा रूग्णालयात जिल्हा अधिकारी यांच्या आदेशा प्रमाणे  जिल्हा रूग्णालयात कडक बंदोबस्त ठेवण्याचा आदेश दिलेला असताना ही याठिकाणी एक ही पोलिस कर्मचारी किंवा होमगार्ड दिसत नाही तरी देखील याकडे कोणत्याच अधिकार्यांचे लक्ष जात नाही. या ठीकाणी जिल्हा अधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपलीच का? कारण दि .०७/१०/२०२० रोजी झालेल्या घटना पासुन जिल्हा अधिकारी यांनी बीड जिल्हा रूग्णालयात कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले असताना देखील या ठिकाणी कडक बंदोबस्त दिसत नाही मोठे अधिकारी आले तर कडक बंदोबस्त, गेले की जैसे थे तैसे! असा स्पष्ट चित्र पाहाण्यास भेटत आहे  जिल्हा अधिकारी यांनी न सांगता एकदा जिल्हा रूग्णालयात येऊन भेट देण्याची गरज याठिकाणी दिसतआहे

No comments:

Post a Comment