बीड,दि. १३ :- (जि.मा.का.) प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा या योजने अंतर्गत लाभार्थीभिमूख भुजलाशयीन मत्स्य व्यवसायाच्या विकास करीता नवीन तळी, तलावांचे बांधकाम, तलावांचे नुतनीकरण, मत्स्य, कोळंबी संवर्धनासाठी निविष्ठा वापरावर अनुदान, भारतीय प्रमुख कार्य व इतर संवर्धनायोग्य माशांच्या बीज उत्पादासाठी मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना करणे यासह विविध मत्स्यसंवर्धन प्रकारच्या योजनांचा समावेश आहे. सदर योजनेची आधिक माहिती http://dof.gov.in/pmmsy या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी सर्व मच्छिमार सहकारी संस्था, सभासद, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार व इतर इच्छुक यांनी जास्तीत जास्त प्रमाणात योजनेचा लाभ घ्यावा व आपले प्रस्ताव 10 ते 15 दिवसात सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावर आणि मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी प.दे.बसवंत यांनी केले आहे.
देशातील मत्स्योत्पादनामध्ये भरीव वाढ व्हावी आणि देशातील मच्छिमारांच्या हित संवर्धनासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही सन 2020-21 पासुन राष्ट्रीय मात्सिकी विकास बोर्ड कडून कार्यान्वित करण्यात आली आहे. सदरच्या योजनेचा अंमलबजावणी कालावधी हा 2020-21 ते 2024-25 असा राहील. केंद्र शासनाच्या सुचना नुसार कृषी व पद्रुम विभाग शासन निर्णय दि. 26 जून 2020 अन्वये पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेच्या अंमलबजावणी करीता जिल्हास्तरीय अमंलबजावणी समिती स्थापन करण्याचे शासन निर्णय निर्गमित आहे. त्यानुसार प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना बीड जिल्हास्तरीय समितीची सभा राहूल रेखावर,जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती यांचे अध्यक्षतेखाली झाली.
सदर सभेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे उपस्थित होते. तसेच ए.एच.बनकर बीड, देवेंद्र ब.लोकरे, कार्यकारी अभियंता, आर.एस.काळे जिल्हा जलसंधारण अधिकारी, उदयराज काळे जिल्हा अग्रणी बँक, डॉ. रविंद्र कोरडे वरिष्ठ वैज्ञानिक कृषी विज्ञान केंद्र , शेख मुक्ष्तार शेख सतार प्रगतिशील मत्स्यव्यवसायीक असे समितीचे सदस्य उपस्थित होते.
प.दे.बसवंत तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाचे बी.आर. मेंढेकर, बी.यु.दराडे, अ.रा.गायकवाड यांनी सहकार्य केले.
यावेळी आराखड्यात मान्यता देण्यात आली असुन जिल्हाधिकारी,बीड यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना लाभार्थी भिमूख होण्यासाठी व्यापक प्रसिध्दी देवून सचिव यांनी योजनेची सविस्तर माहिती समितीस सादर करण्यात आली.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रमुख उदिष्टे खालील प्रमाणे- केंद्र शासनामार्फत मत्स्यव्यवसाय हा पुरक व अग्रक्रमीत व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे व याद्वारे भुजलाशयीन क्षेत्रातील सामाजिक व आर्थिक दृष्टया कमकुवत पारंपारिक मच्छिमारांचे, मत्स्यव्यवसायकांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शाश्वत आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत व रोजगार निर्मीतीच्या संधी निर्माण करणे. कृषी क्षेत्राच्या सकल मुल्यात वाढ करणे आणि निर्यातीत योगदान वाढविणे.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा कालावधी 2020-21 ते 2024-25 असा आहे. या कालावधी करीता केंद्र शासनाने एकूण रु.20 हजार कोटी गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये केंद्र हिस्सा रु.4880/- कोटी आणि लाभार्थी हिस्सा रु.5763 कोटी या प्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे. या योजने अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रकल्प किंमतीच्या 40 (केंद्र हिस्सा 24 व राज्य हिस्सा 16) व अनुसूचित जाती,जमाती,महिला या प्रवर्गासाठी प्रकल्प किंमतीच्या 60 (केंद्र हिस्सा 36 व राज्य हिस्सा 24) या सुत्राप्रमाणे अर्थसहाय्य मंजूर करण्याची तरतूर आहे. प्रकल्प किंमतीच्या अर्थसहाय्या व्यतिरिक्त उर्वरित रक्कम ही लाभार्थी हिस्सा असेल.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा या योजने अंतर्गत लाभार्थीभिमूख भुजलाशयीन मत्स्यव्यवसायाच्या विकासाकरीता नविन तळी, तलावांचे बांधकाम, अस्तीत्वातील तळी, तलावांचे नुतनीकरण, मत्स्य, कोळंबी संवर्धनासाठी निविष्ठा वापरावर अनुदान, भारतीय प्रमुख कार्प व इतर संवर्धनायोग्य माशांच्या बीज उत्पादासाठी मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना करणे, मासळी वाहतूकीच्या पायाभूत सुविधेसाठी अर्थसहाय्य, शोभिवंत मासे संवर्धन व विक्री, मच्छिमारांना विमाछत्र, प्रशिक्षण कार्यक्रम, बर्फ कारखाना, शीतरोधक वाहने, पुनर्चक्रीय पध्दतीने मत्स्यसंवर्धन आणि जेवपुंज पध्दतीने मत्स्यसंवर्धन इत्यादी प्रकारच्या योजनांचा समावेश आहे.
सदर योजनेतील प्रकल्प सादर करतांना आवश्यक कागदपत्रे विहीत नमुना अर्ज, प्रकल्प अहवाल प्रकल्पाचे अदांजपत्रक आराखडा नकाशा, जागेचा पुरावा अथवा भाडेपट्टी जागेची करारनामा, हमी पत्र, साहित्याचे जीएसटी देयके,दरपत्रके, आधार कार्ड, प्रकल्पासाठी लाभार्थी हिस्सा पोटी रक्कम असलेले बँक खाते स्टेंटमेंट, पाण्याची, विजेची उपलब्धता बाबत हमी पत्र, या व्यक्तीरिक्त योजनेच्या मार्गदर्शन सुचना नुसार रु.100/- स्टॅम्प पेपरवर आवश्यक हमी पत्रे, घोषनापत्रे व ईतर आवश्यक कागदपत्रे प्रस्ताव 4 प्रतीत सादर करणे राहील.
तसेच बीड जिल्हयात प्रस्तुत योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास इच्छुक लाभार्थीनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, बीड, पहिला मजला, दहिफळे निवास, यशोदिप हॉटेल समोर, शिवाजी नगर, बार्शी रोड, बीड . दुरध्वणी (02442) 222709 ईमेल आयडी- acfbeed@gmail.com येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावाअसे आवाहन सहाय्यक आयुकत मत्स्यव्यवसाय, बीड कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
*-*-*-*-*-*-*
No comments:
Post a Comment