*तुळजापूर येथे देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची माेठी गर्दी असते.
तुळजापूर (प्रतिनिधी) तुळजाभवानी मंदीरातील व्हिआयपी दर्शन पास तसेच स्पेशल पासचा गैरप्रकार रोखण्यासाठी मंदीर संस्थानने उपाय याेजना करावी अशी मागणी पुजारी मंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना दिलेल्या निवेदनात पास स्कॅन करण्यासह एकुण वितरीत व्हिआयपी दर्शन व स्पेशल पास आणि स्कॅन केलेल्या पासची संख्या स्क्रिनच्या माध्यमातून प्रसिद्ध करावी अशी मागणी पुजारी मंडळाने नमूद केली आहे.
तसेच पासचे पेमेंट देखील युपीआयच्या माध्यमातून स्विकारण्याची मागणी केली आहे. मंदीर सुरक्षा रक्षकांच्या संगनमताने एकच पास अनेकदा वापरत असल्याचा आरोप देखील निवेदनातून करण्यात आला आहे. यामुळे पुजारी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांना निवेदनाद्वारे पासबाबत पारदर्शकता आणण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment