Saturday, February 11, 2023

बीड जालना रोडवर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात. दोन गंभीर जखमी एकाची प्रकृती चिंताजनक.

गेवराई (प्रतिनिधी) बीड जालना रोडवर आज दि 11 दुपारी 2 वा दरम्यान अपघात झाला या अपघातात गाडीच्या  5 पलट्या होवुन गाडीतील दोघे गंभीर झाल्याची घटना घडली आहे 
या घटने संदर्भात मिळालेली माहिती अशी की गेवराई शहराजवळील बीड जालना रोडवर गढी येथील उड्डाण पुलावर बीड च्या दिशेने भरघाव वेगात येणारी ब्रेजा कार चालकाच नियंत्रण सुटल्यामुळे पलटी झाली पुला जवळ बिघाड झालेली बुलेरो गाडी उभा होती परंतु पाठी मागुन येणारा ब्रेजा चालक वेगात असल्यामुळे त्याला गाडीचा अंदाज आला नाही बुलेरोला वाचवण्याच्या नादात त्याने गाडी डिवायडर वर घातली तेथुन गाडीने 4 ते पाच पलट्या घेतल्या यामध्ये एकजण गाडीतुन बाहेर फेकला गेला तर एक गाडीतच अडकला सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी गेले पंचनामा करुन रोड रहदारीस मोकळा केला .सदर रोडचे रुंदीकरण करुण वनवे झाला आसला तरी आपघाताच्या घटना घडत आहे . 

No comments:

Post a Comment